amravaticitynewsCrime News

गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई! टाटा कंपनीची चोरीला गेलेली मिनी बस जप्त; दोन आरोपींना अटक

१२ लाख रुपये किमतीची मिनी बस हस्तगत; गोपनीय माहितीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांची यशस्वी कारवाई

अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली टाटा कंपनीची मिनी बस शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीची बस जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बसची किंमत १२ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी नितीन राजेश खंडार (वय ४०, व्यवसाय नोकरी, रा. सारंग नगर, रहाटगाव, अमरावती) यांच्या मालकीची टाटा कंपनीची मिनी बस (क्रमांक MH27/A-9880) ही १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता उभी करून ठेवण्यात आली होती. या बसची चावी फिर्यादीच्या घरात असल्याने त्यांनी वाहन सुरक्षित असल्याचे गृहीत धरले होते.

मात्र, २० ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास बस चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेतल्यानंतरही बस मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील माहिती संकलित केली. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे चोरीची मिनी बस चांदूर बाजार परिसरातील एका पार्किंगमध्ये असल्याचे समोर आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन संशयितांना ताब्यात घेतले.

आरोपींची नावे नेमस साहेबराव बाठेकर (वय २७, रा. संभाजी नगर, चांदूर बाजार, अमरावती) आणि साहेबराव लक्ष्मणराव बाठेकर (वय ५८, रा. चांदूर बाजार, अमरावती) अशी आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, चोरीच्या गुन्ह्याचा तपास पुढे सरकला. त्यांच्याकडून १२ लाख रुपये किमतीची टाटा मिनी बस जप्त करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ यशवंत साळवे आणि सहायक पोलीस आयुक्त निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गाडगेनगर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संदीप हिवाळे, पोलीस कर्मचारी भारत वनसखडे, राजेश गुरुळे, मतीन शेख, सुशांत प्रधान, धनराज कुमरे, महेश शर्मा तसेच वाहनचालक विनोद दांडगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button