Amravaticitynews

अमरावतीत कालीमाता, अंबामाता, एकवीरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात; कालीमाता मंदिरात नऊ कुंडीय महायज्ञाचे आयोजन

अमरावती प्रतिनिधी : अंबानगरी अमरावतीत शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. शहरातील प्राचीन कालीमाता मंदिरासह अंबामाता आणि एकवीरा माता संस्थानात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढत आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने मंदिरांमध्ये धार्मिक विधी आणि पूजाअर्चा सुरू असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

कालीमाता मंदिर संस्थानात पीठाधीश्वर डॉ. शक्ती महाराज यांच्या नेतृत्वाखाली नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ कुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून, देवीच्या शोभायात्रेमुळे उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.

दरम्यान, मंदिर परिसरात पूजासाहित्य आणि प्रसादाच्या दुकानांची सजावट करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा, तसेच सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती नांदावी, अशी प्रार्थना भाविकांनी देवीचरणी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button