citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात दुकान फोडणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे ताब्यात, एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही घेतले ताब्यात

गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ ची मोठी कारवाई; दोन गुन्हे उघडकीस, १ हजार १५० रुपयांची रोकड जप्त

नागपूर : दुकान फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोघांना आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान दोन दुकानफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून १ हजार १५० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक ३ च्या पथकाने दुकानफोडीच्या घटनांचा तपास करत संशयितांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी पियुष उर्फ डिजे नितेश सोनेटक्के आणि वृत्तांत दीपक द्रविडकर यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधितांकडून दुकानफोडीच्या दोन गुन्ह्यांची माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच चोरीच्या रकमेतून १,१५० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुढील तपासासाठी त्यांना सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर आणि त्यांच्या पथकाने केली.

दुकानफोडीच्या घटनांचा तपास करत गुन्हे शाखेने टोळीचा माग काढल्याने परिसरातील चोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button