citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeWashim

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींच्या छेडछाडीचा आरोप; शिक्षकाला अटक

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई; अयोग्य स्पर्श आणि लैंगिक स्वरूपाचा त्रास दिल्याचा विद्यार्थिनींचा आरोप

वाशिम : वाशिम तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींच्या छेडछाडीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श आणि लैंगिक स्वरूपाचा त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित शिक्षकाला अटक केली आहे.

वाशिम तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार समोर आला. काही विद्यार्थिनींच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आणि शाळेत जाऊन प्राथमिक चौकशी सुरू केली.

पोलिसांनी विद्यार्थिनींची इन-कॅमेरा विचारपूस केली. यावेळी संबंधित शिक्षकाकडून अयोग्य स्पर्श आणि लैंगिक स्वरूपाचा त्रास दिला जात असल्याची माहिती विद्यार्थिनींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, काही विद्यार्थिनींनी हा प्रकार तिसरी इयत्तेपासून सुरू असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याची शक्यता असून, आणखी किती विद्यार्थिनी या प्रकारामुळे प्रभावित झाल्या आहेत, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या प्रकरणी संबंधित शिक्षक दिलीप बोरकर याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला रात्री अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून विद्यार्थिनींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच या प्रकरणातील सर्व बाबी तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.

अल्पवयीन विद्यार्थिनींचा समावेश असल्याने पोलिसांकडून त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेत तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तक्रारींची नेमकी व्याप्ती किती आहे, याचाही तपास केला जात आहे.

बाईट : श्रीदेवी पाटील, ठाणेदार, ग्रामीण पोलीस स्टेशन

दरम्यान, विद्यार्थिनींच्या आरोपांनंतर संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे. तपासातून या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button