citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrimeNagpurNagpur graminNagpurCrimeNagpurPolice

नागपूरच्या पाचपावलीत चोरट्यांचा धुमाकूळ!

एकाच दिवशी चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरातील पाचपावली परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच दिवशी चार घरफोड्यांच्या घटना घडवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केल्याची माहिती समोर आली आहे.

सलग घडलेल्या या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या घरफोड्यांमुळे नागरिकांनी पोलिसांच्या गस्तीसह सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

घटनांची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. चोरीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करण्यात येत आहे.

मात्र, वृत्त लिहिपर्यंत चोरट्यांचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, नागरिकांनी परिसरात रात्रीच्या गस्तीचे प्रमाण वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच घरफोड्यांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

एकाच दिवशी चार घरफोड्यांच्या घटना घडल्याने पाचपावली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना तातडीने अटक करून चोरीच्या घटनांवर आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button