AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

बकरीदच्या पार्श्वभूमीवर नागपूर गेट पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक; नागरिकांना सौहार्द जपण्याचे आवाहन

अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस ठाण्यात आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत सण शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला पोलीस उपायुक्त (DCP) गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) शिवाजीराव बचाटे तसेच नागपूर गेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्लागोंडावार उपस्थित होते.

यावेळी बकरीद सण शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. तसेच शहरातील विविध सामाजिक प्रश्न, स्थानिक समस्या आणि सणांच्या काळातील आवश्यक खबरदारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

DCP गणेश शिंदे यांनी शांतता समितीच्या सदस्यांशी संवाद साधताना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद बाब तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले. सामाजिक सलोखा आणि परस्पर आदर राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला माजी नगरसेवक हमीद शद्दा, सादिक भाई कुरेशी, रहमत भाई उर्फ रफ्फू, पत्रकार शफीक राजा, हाजी रफीक हेल्पलाईनचे सदस्य आरिफ हुसेन यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. आगामी बकरीद सण शांततेत आणि बंधुभावाने साजरा व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button