BeedcitynewsLatest NewsMaharashtra

बीडमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाईचा भडका! नागरिकांचा संताप अनावर, रस्ते रोखून आंदोलन

बीड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आज नवव्या दिवशीही कायम असून नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इंधन उपलब्ध होत नसल्याने संतप्त नागरिकांनी अनेक पेट्रोल पंपांकडे जाणारे रस्ते बंद करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. काही ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे दगड, लाकडं आणि वाहनं टाकून मार्ग रोखण्यात आले. त्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर “नो स्टॉक”चे फलक झळकत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. चार-चार दिवस पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अत्यावश्यक सेवांसाठी लागणारे इंधनही आता संपत आले असल्याची चिंता वाहनचालक व्यक्त करत आहेत.

याबाबत प्रतिक्रिया देताना एका पेट्रोल पंप चालकाने सांगितले की, “चार दिवसांपासून पुरेसा इंधनसाठा मिळत नाही. त्यामुळे सर्वांना पेट्रोल-डिझेल देणे शक्य होत नाही. नागरिकांनीही संयम आणि सहकार्य ठेवण्याची गरज आहे.”

इंधनटंचाईमुळे जिल्ह्यातील दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button