Latest NewsVidarbh Samachar

जळगाव : महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक पुन्हा सज्ज; एसपी श्रीकांत देवरे यांच्या हस्ते शुभारंभ

महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देत जिल्हा पोलीस प्रशासनाने दामिनी पथक पुन्हा कार्यान्वित केले असून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या हस्ते दामिनी पथकांच्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

महिला हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी दामिनी पथक कार्यरत राहणार असून कॉल आल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालून महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

यासोबतच विद्यार्थिनींना ‘गुड टच, बॅड टच’ विषयी जनजागृती करण्यात येणार असून सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम आणि सायबर गुन्ह्यांपासून बचावाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

अल्पवयीन मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपासून बंद असलेले दामिनी पथक पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button