citynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

नसरापूर अत्याचार प्रकरणावर डॉ. अनिल बोंडे संतप्त; “अशा आरोपींना ठेसून मारायला पाहिजे”

पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

नसरापूर येथील अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असताना, अमरावतीत माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

या वेळी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. “अशा आरोपींना ठेसून मारायला पाहिजे,” असे संतप्त विधान करत त्यांनी प्रशासनाला कठोर संदेश दिला.

डॉ. बोंडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एका महिन्याच्या आत आरोपीला शिक्षा होईल, असे आश्वासन दिले आहे.

यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या मागण्याही मांडल्या —
👉 बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मिळू नये
👉 चार्जशीटच्या आधारे जलदगतीने सुनावणी होऊन कठोर शिक्षा झाली पाहिजे

या प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कायदा-सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नसरापूर प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया अधिक तीव्र होत असून, आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. आता या प्रकरणात पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया किती वेगाने पुढे सरकते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button