citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraRaigad

अलिबागमध्ये संतापजनक प्रकार; स्कूल व्हॅन चालकावर नववीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात एक संतापजनक घटना समोर आली आहे. मांडवा परिसरात शाळेत ये-जा करणाऱ्या नववीतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा स्कूल व्हॅन चालकाने विनयभंग केल्याचा आरोप असून, या प्रकरणी आरोपीविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे स्कूल व्हॅनने शाळेत जात होती. याच दरम्यान व्हॅन चालकाने तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरी परतल्यानंतर विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तात्काळ मांडवा सागरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेनंतर परिसरातील पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, शाळा प्रशासन आणि वाहतूक व्यवस्थेवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

मांडवा सागरी पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button