Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूर–जबलपूर महामार्गावर भीषण अपघात – दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, अज्ञात वाहनचालक फरार!

नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर पुन्हा एकदा वेगाने जीव घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवलापारजवळील कट्टा गावाजवळ आज दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामसिंग विश्वकर्मा (वय 29, रा. सारजदौत, ता. कुरई, जि. सिवनी) हे आपल्या साथीदार ऋषी कुमरे (वय 35) यांच्यासह दुचाकीने सिवनीहून नागपूरकडे येत होते. दरम्यान, देवलापारजवळील कट्टा शिवारात पोहोचताच मागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत रामसिंग विश्वकर्मा रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले ऋषी कुमरे हे रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस तसेच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

👉 एकच संदेश: वेग, निष्काळजीपणा आणि नियमांचा भंग — हेच अपघाताचे मुख्य कारण ठरत आहेत. वाहन चालवताना सतर्कता बाळगा… कारण एक चूक आयुष्यभराची शिक्षा ठरू शकते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button