AmravaticitynewsEducation NewsLatest NewsMaharashtra

एकाच दिवशी १२ व्यवसायांचे प्रशिक्षण; अमरावतीत तरुणांसाठी ‘स्किल बूस्ट’ कार्यशाळा

अमरावती : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग खुला करणारी अनोखी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा बडनेरा येथे पार पडली. या कार्यशाळेत एका दिवसात तब्बल १२ व्यवसायांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीद्वारे संचालित समाजकार्य महाविद्यालय आणि द. काळभैरव आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कालभैरव आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे संचालक यश इंगोले उपस्थित होते.

या कार्यशाळेची खासियत म्हणजे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून व्यवसाय शिकवण्यात आले. यात अगरबत्ती, फिनाईल, फ्लोअर क्लीनर, वॉशिंग पावडर, आयुर्वेदिक साबण, हँडवॉश, डिटर्जंट लिक्विड, डिशवॉश लिक्विड, परफ्यूम, धूपबत्ती, शाम्पू, दंतमंजन आणि आईस कँडी अशा विविध व्यवसायांचा समावेश होता.

फक्त उत्पादननिर्मितीच नव्हे, तर व्यवसाय सुरू करण्याच्या पद्धती, मार्केटिंगची रणनीती आणि शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ॲड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यशाळेत १२५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा आत्मविश्वास मिळवला.

“एक दिवस… १२ व्यवसाय… आणि आत्मनिर्भरतेकडे मोठं पाऊल!”
अमरावतीतील ही कार्यशाळा तरुणांसाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button