Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

आंबेडकर जयंतीनिमित्त अमरावतीत वाहतूक बदल; इर्विन चौक परिसरात रस्ते बंद

अमरावती (दि. १३) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी शहरात विविध मिरवणुका आणि उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती शहर वाहतूक विभागाकडून तात्पुरते वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त श्याम घुगे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

या अधिसूचनेनुसार, १४ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गांनी वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

⛔ हे मार्ग राहतील बंद :

  • इर्विन चौक ते खापर्डे बगीचा
  • गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक
  • बाबा कॉर्नर ते इर्विन चौक
  • मर्च्युरी टी-पॉईंट ते इर्विन चौक
  • इर्विन चौक ते मालविय चौक

तसेच, मर्च्युरी टी-पॉईंट ते इर्विन चौक, ट्रॅफिक ऑफिस परिसर आणि इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे.

🔁 पर्यायी मार्ग :

  • इर्विन चौक–खापर्डे बगीचा मार्गावरील वाहने एस.टी. बसस्थानक मार्गाने वळवली जातील
  • गर्ल्स हायस्कूल चौक–इर्विन चौक मार्गावरील वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर–विलासनगर रोडने जातील
  • बाबा कॉर्नर–इर्विन चौक मार्गावरील वाहने लेखूमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप मार्गाने वळतील
  • रेल्वे स्टेशन चौक–मर्च्युरी टी-पॉईंट मार्गावरील वाहने रेल्वे स्टेशन–एस.टी. स्थानक–जयस्तंभ चौक–दीपक चौक–चौधरी चौक या मार्गाने वळवली जातील
  • मालविय चौक–इर्विन चौक मार्गावरील वाहने मालविय चौक–जयस्तंभ चौक–रेल्वे स्टेशन चौक मार्गाने जातील

दरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.

नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करून प्रवास करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button