AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत IPL सट्ट्यावर पोलिसांचा धडक प्रहार! दस्तूर नगरमध्ये रेड — तरुण रंगेहात पकडला, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरात आयपीएल सामन्यांवर सुरू असलेल्या ऑनलाईन सट्ट्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाला रंगेहात पकडले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दस्तूर नगर परिसरात छापा टाकत हा सट्ट्याचा खेळ उधळून लावला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे दस्तूर नगर येथील मनपा उद्यानासमोर छापा टाकण्यात आला.

या वेळी गिरीश उर्फ प्रिन्स ददलानी हा तरुण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा चालवत असल्याचे उघड झाले. तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या आयपीएल सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती समोर आली.

पोलिसांच्या तपासात त्याच्या मोबाईलमध्ये “OSTIN777” नावाचे बेकायदेशीर अ‍ॅप आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत आयफोन ११ आणि सट्ट्याचे साहित्य जप्त केले.

या कारवाईत एकूण ४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, आयपीएलच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढलेल्या ऑनलाईन सट्ट्याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून, अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

📺 अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button