अमरावतीत ‘गौमाता रक्ततुला’चा अनोखा उपक्रम! समाजसेवा, श्रद्धा आणि रक्तदानाचा संगम

अमरावतीतून एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम समोर आला आहे. गौसंवर्धन आणि समाजसेवेच्या भावनेतून “गौमाता रक्ततुला” या अनोख्या अभियानाची सुरुवात होत असून, विशेष म्हणजे असा उपक्रम पहिल्यांदाच अमरावतीत आणि जगात आयोजित केला जात असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
शहरात ११ ते १९ एप्रिल दरम्यान धार्मिक, सामाजिक आणि सेवा कार्यांची भव्य मालिका आयोजित करण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश —
👉 गौसंवर्धन
👉 समाजप्रबोधन
👉 रक्तदानास प्रोत्साहन
या अंतर्गत १५०० युनिट रक्त संकलनाचा संकल्प करण्यात आला असून, आतापर्यंत ७०० युनिट रक्त संकलन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.
📍 १२ एप्रिल रोजी
👉 श्री माहेश्वरी भवन, धनराज लेन येथे
🕘 सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
याशिवाय अमरावतीसोबतच दर्यापुर, अंजनगाव, वरुड, धामणगाव या ठिकाणीही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
📍 १९ एप्रिलला
👉 भगवान परशुराम आणि गौमातेची भव्य शोभायात्रा
👉 “गौमाता रक्ततुला” हा मुख्य आकर्षण
या सोहळ्यात विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार असून, कार्यक्रमाला धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान मिळणार आहे.
दरम्यान,
👉 हनुमान चालीसा पाठ
👉 सुंदरकांड
👉 महाआरती
👉 वृद्धाश्रमात भोजन सेवा
अशा विविध उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.
हा उपक्रम केवळ धार्मिक नाही, तर समाजसेवेचा एक मोठा संदेश देणारा आहे. आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
📺 अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत राहा — सिटी न्यूज



