Amaravti GraminAmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत हनुमान जयंतीचा जल्लोष! दसरा मैदानातील संकट मोचन विजय हनुमान मंदिरात भक्तांची उसळलेली गर्दी

अमरावती | प्रतिनिधी
संपूर्ण देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावतीतही भक्तीचा अनोखा उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील दसरा मैदान परिसरातील प्रसिद्ध संकट मोचन विजय हनुमान मंदिरात सध्या भक्तांचा प्रचंड ओघ सुरू असून परिसर भक्तिमय झाला आहे.

अमरावती-बडनेरा मार्गावरील या मंदिरात १ एप्रिलपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुंदरकांड पठण, हनुमानजींचा लघु रुद्राभिषेक आणि मंगलमय महाआरती यांचा समावेश होता. या कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

आज, २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

दरम्यान, आज दिवसभर भव्य महाप्रसाद आणि सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. दिवसभर सुरू असलेल्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांचा ओघ अद्यापही कायम आहे.

अमरावतीच्या संकट मोचन विजय हनुमान मंदिरात आज भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अपूर्व संगम पाहायला मिळत असून हनुमान भक्तांसाठी हा दिवस विशेष ठरत आहे.

अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button