Crime NewsLatest NewsNanded

नांदेड हादरलं! 19 वर्षीय तरुणीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये घडली. संबंधित तरुणी ही नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावची रहिवासी होती. ती शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहत होती.

दरम्यान, हॉस्टेलमधील खोलीत ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही बाब लक्षात येताच तात्काळ प्रशासनाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासात वैयक्तिक कारणांचा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.

या घटनेमुळे महाविद्यालयीन परिसरात तसेच वाघी गावात शोककळा पसरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button