citynewsLatest NewsMaharashtraNanded

माहूर नगरपंचायतीचे नागरिकांना आवाहन; नळपट्टी व घरपट्टी १००% भरण्याचे निर्देश

माहूर : शहरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी माहूर नगरपंचायतीकडून नागरिकांना नळपट्टी व घरपट्टी शंभर टक्के भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी यासंदर्भात नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या शहरात विविध विकासकामे सुरू असून शासनाच्या निकषांनुसार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि नियोजित कामांसाठी निधी मिळवण्यासाठी कर वसुली पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. यासाठी नगरपंचायतीकडून ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत असून कर्मचारी घरोघरी जाऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करत आहेत.

शहरातील अनेक नागरिकांनी प्लॉट्स खरेदी केले असून ते बाहेरगावी वास्तव्यास असल्याने त्यांच्या मालमत्तेवरील कर थकलेले आहेत. अशा सर्व मालमत्ता धारकांनी तसेच नळ कनेक्शन धारकांनी आपली थकबाकी तात्काळ भरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेत कर विभाग प्रमुख स्वाती गुव्हाडे, कार्यालय अधीक्षक, लेखापाल विशाल मरेवाड, संदीप गजलवाड, धनंजय कळसकर आणि इतर कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले आहेत.

नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कर भरणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button