citynewsIndia NewsLatest News
उत्तराखंडमध्ये सकाळच्या फेरफटक्यात निवृत्त ब्रिगेडियरचा गोळी लागून मृत्यू

देहरादून : उत्तराखंडमधील देहरादून येथे सोमवारी (30 मार्च 2026) सकाळच्या फेरफटक्यादरम्यान एका निवृत्त लष्करी ब्रिगेडियरचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव व्ही. के. जोशी असे असून ते राजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोहरी गावातील तुला अपार्टमेंटजवळ फिरत होते. याच वेळी दोन वाहनांमधील व्यक्तींमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला आणि त्यातील एक गोळी जोशी यांना लागली.
गोळी लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही गोळी अज्ञात हल्लेखोरांकडून झाडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून, या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.



