नाशिक ‘भोंदू बाबा’ प्रकरण; SIT कडे 5 दिवसांत 50 हून अधिक तक्रारी

नाशिक :
बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडे (SIT) गेल्या पाच दिवसांत 50 हून अधिक फोन कॉल्सद्वारे तक्रारी आणि माहिती प्राप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
SIT ने यासाठी दोन विशेष मोबाईल क्रमांक सुरू केले असून त्यावर दररोज सरासरी 15 ते 20 कॉल्स येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या कॉल्समधून आरोपीविरोधातील विविध गुन्ह्यांची माहिती आणि तक्रारी समोर येत आहेत.
प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची सध्या पडताळणी केली जात असून, योग्य माहितीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



