citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpur

नागपूरात ७४ लाखांचा आर्थिक घोटाळा; कंपनीतील अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा

नागपूर :
शहरात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून कंपनीतीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल ७४ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑटोमोटीव्ह चौक परिसरातील एका खासगी कंपनीत हा प्रकार घडला आहे. फिर्यादी राजेश मृत्युंजय मिश्रा (वय ५७), हे संबंधित कंपनीत प्रेसीडेंट पदावर कार्यरत असून त्यांच्या तक्रारीवरून हा प्रकार उघड झाला आहे.

तक्रारीनुसार, कंपनीतील दोन वरिष्ठ अधिकारी—सुशिल रमेशराव भोले आणि चेतन दामोधर तरारे यांनी संगनमत करून कंपनीचा विश्वासघात केला. आरोपींनी ग्राहकांना कंपनीच्या नावाने खोटी बिले दिली आणि ग्राहकांकडून ऑनलाईन मिळालेली रक्कम थेट स्वतःच्या बँक खात्यात वळवली.

तपासादरम्यान काही निवडक ग्राहकांना १०० टक्के सवलत देऊन स्वतःचा फायदा करून घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण घोटाळ्यात कंपनीची सुमारे ₹७४,७०,९८४ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून सध्या आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच अशा प्रकारचा विश्वासघात होणे ही गंभीर बाब मानली जात असून या तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button