citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये महिलेची छेडछाड; जबरदस्तीचा प्रयत्न करणारा आरोपी काही तासांत अटकेत

नागपूरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या एका महिलेसोबत अज्ञात तरुणाने छेडछाड करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

ही घटना २४ तारखेला सकाळच्या सुमारास नागपूरमधील विमावडा परिसरात घडली. संबंधित महिला आपल्या कामानिमित्त रस्त्यावरून जात असताना अचानक एक तरुण मागून आला आणि तिला अडवत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत जबरदस्तीने चुंबन घेण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकारामुळे महिला घाबरली असली तरी तिने धैर्य दाखवत तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. डीबी पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपीचा माग काढला.

तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवत पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा घटना समाजासाठी गंभीर आणि चिंताजनक असून, वेळेत कारवाई करणाऱ्या पोलिसांचेही कौतुक केले जात आहे. महिलांनी सतर्क राहून अशा प्रकारांबाबत तात्काळ तक्रार करणे गरजेचे असल्याचेही आवाहन करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button