citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; अल्पवयीनांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त

नागपूरमधून पोलिसांची मोठी कारवाई समोर आली असून, अल्पवयीन मुलांकडून सुरू असलेल्या गुन्हेगारीवर पोलिसांनी धडक कारवाई करत लाखोंचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही घटना नागपूरमधील चंद्रमणी नगर परिसरातील आहे. नंदिनी अमित भुंगाडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत, त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या असताना त्यांच्या घरात चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

दरम्यान, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की काही अल्पवयीन मुलं एका ग्राउंड परिसरात बसून चोरीच्या सोन्याच्या वस्तू विकण्याबाबत चर्चा करत आहेत. माहिती मिळताच तपास पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला आणि दोन्ही मुलांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्यांच्या जवळून सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल आणि एक ॲक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पुढील चौकशीत हे दोन्ही मुलं विधीसंघर्षग्रस्त असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून ते आई-वडिलांशिवाय राहत असल्याचेही उघड झाले आहे. नवीन कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांवरही कारवाई केली जात आहे.

या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अल्पवयीन मुलं गुन्हेगारीकडे वळत असल्याची ही घटना चिंताजनक असली, तरी वेळेत कारवाई करून पोलिसांनी मोठं नुकसान टाळलं आहे. पालक आणि समाजाने अशा मुलांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button