Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest NewsMaharashtra

LPG बुकिंग नियमांबाबत व्हायरल मेसेज फेक; PIB कडून अधिकृत स्पष्टीकरण

एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगच्या नव्या नियमांबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. Press Information Bureau (PIB) ने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देत नागरिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा करण्यात येत होता की, Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) लाभार्थींना 45 दिवसांनी, तर सामान्य ग्राहकांना 25 किंवा 35 दिवसांनीच गॅस बुक करता येईल. मात्र, PIB ने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

PIB दिल्लीच्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सध्याचे नियम असे आहेत:
👉 शहरी भागात – सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी 25 दिवसांनंतर बुकिंग
👉 ग्रामीण भागात – सर्व प्रकारच्या कनेक्शनसाठी 45 दिवसांनंतर बुकिंग

हे नियम PMUY आणि नॉन-PMUY ग्राहकांवर आधारित नसून, फक्त शहरी आणि ग्रामीण भागावर आधारित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन सिलिंडर असलेल्या ग्राहकांसाठी 35 दिवसांची नवीन अट लागू केल्याचा दावा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, हा दावाही सरकारने पूर्णपणे खोटा ठरवला आहे.

सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अप्रमाणित मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि ते पुढे फॉरवर्ड करू नयेत. देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने घाबरून ‘पॅनिक बुकिंग’ करण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिकृत माहितीसाठी Indian Oil Corporation, Bharat Petroleum आणि Hindustan Petroleum यांच्या अधिकृत संकेतस्थळांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

म्हणजेच स्पष्ट आहे… एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहा आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button