Crime NewsLatest NewsMaharashtra

परळीत संतापजनक प्रकार! ९ वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धर्मापुरी गावात एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ५० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला खाऊ देण्याचा बहाणा करून जवळ बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकंच नाही तर, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.

धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलीने धाडस दाखवत आपल्या वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी याआधीही आपल्यावर अत्याचार झाल्याची माहितीही तिने दिली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button