AmravatiEducation NewsLatest News

महाविद्यालयांनी विद्याथ्र्यांचा संशोधन आराखडा तातडीने पाठविण्याचे विद्यापीठाचे आवाहन

विद्याथ्र्यांच्या संशोधन मान्यता समित्या ऑनलाईन पध्दतीने दि. 23 मार्च, 2026 पासून घ्यावयाच्या असल्याने महाविद्यालयांनी विद्याथ्र्यांचा संशोधन आराखडा तातडीने पाठवावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने संशोधन केंद्रांकडून मागविलेला संशोधन आराखडा दि. 13 नोव्हेंबर, 2025 ते 05 फेब्राुवारी, 2026 या दरम्यान संपन्न झालेल्या आरआरसी सभेमध्ये सादर करण्यात आलेला होता. संशोधन केंद्रांनी ज्या विद्याथ्र्यांचा संशोधन आराखडा निदेश क्र.41/2025 मधील तरतूद क्र. 6 नुसार सादर न केल्यामुळे आरआरसी सभेव्दारा त्या विद्याथ्र्यांचे प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आले होते.
या अनुषंगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी मान्यता दिल्यानुसार सदर विद्याथ्र्यांच्या संशोधन मान्यता समित्या ऑनलाईन पध्दतीने दि. 23 मार्च, 2026 पासून घ्यावयाच्या असल्याने संशोधन केंद्रांनी विद्याथ्र्यांचे संशोधन आराखडा ची पीडीएफ कॉपी तातडीने त्यांना विद्यापीठाव्दारे कळविलेल्या ई मेल वर दि. 21 मार्च, 2026 पर्यंत पाठवावी, जेणेकरुन आचार्य कक्ष विभागाला कार्यवाही करणे सोयीचे होईल. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, संशोधन केंद्रांना आचार्य कक्षाकडून पत्राव्दारे कळविण्यात आले आहे, असे आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव मीनल मालधुरे यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button