AmravatiEducation NewsLatest News

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात २४ मार्च रोजी ‘शहीद दिन’ व्याख्यानाचे आयोजन

 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक  २४ मार्च २०२६ रोजी शहीद दिनानिमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम दुपारी २.३० वाजता विद्यापीठ परिसरातील डॉ. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र येथील सभागृहात संपन्न होणार आहे.  
            ‘शहीदांच्या स्वप्नातील भारत’  या विषयावर  श्री. व्यंकटेश महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. मधुकर बाळासाहेब जाधव अभ्यासपूर्ण व्याख्यान देणार आहेत. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे अध्यक्षस्थान भूषवणार असून याप्रसंगी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विजय नागरे, तसेच अधिसभा सदस्य श्री. नितीन टाले आणि श्री. कैलास चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.  

         व्याख्यान कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button