City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपूरमध्ये फरार सराईत गुन्हेगारांना अटक; धारदार शस्त्राने हल्ला प्रकरण उघड

नागपूर, प्रतिनिधी :
नागपूर पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत मागील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना अखेर अटक केली आहे. धारदार शस्त्राने जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या आरोपींना गुप्त माहितीच्या आधारे जाळ्यात ओढण्यात पोलिसांना यश आले.

नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील तीन सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती.

फिर्यादी नॅव्ही रामटेके हे त्यांच्या मैत्रिणीसोबत मोबाईलवर बोलत असताना आरोपी संकेत वंजारी याचा फोन आला. कॉन्फरन्स कॉलदरम्यान सुरू झालेल्या वादातून आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर आरोपी संकेत वंजारी, त्याचे साथीदार आणि वैभव तन्नेलवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फिर्यादीवर हातबुक्कीने मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले.

या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या आरोपींचा संबंध वाठोळा पोलीस ठाण्यातील आणखी एका गंभीर गुन्ह्याशी असल्याचेही समोर आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी मागील तीन महिन्यांपासून फरार होते. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्यांचा माग काढला. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

नागपूर पोलिसांची ही कारवाई त्यांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे उदाहरण ठरली आहे. अशा धाडसी कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होऊन शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button