Crime NewsLatest NewsNagpur

नागपुरात घरफोडी प्रकरणी आरोपी अटक; १.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे १ लाख २२ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली होती. फिर्यादी गिरीश बळीराम लोणारे हे कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नासाठी खापरी येथे गेले असताना अज्ञात इसमाने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती.

या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी पियुष उर्फ भांजा राजू उर्फ राजेश शाहू याला ताब्यात घेतले.

आरोपीकडून एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्याची चैन, पदक, बारीक मणी, कानातील रिंग व बाली तसेच चांदीच्या पायपट्ट्या आणि शिक्क्याचा समावेश आहे.

ही कारवाई Ravindra Kumar Singal, पोलीस आयुक्त, Navinchandra Reddy, सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, गुन्हे शाखेचे प्रभाकर कवाळे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button