AmravatiLatest NewsSocial News

आविष्कार स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्याथ्र्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार

विद्याथ्र्यांनी संशोधनातून स्वत:चे स्टार्टअप उभे करावे – कुलगुरू

अमरावती (दि.18.02.2026) –  पुणे-मुंबईसारख्या महानगरांशी तुलना करता आपल्या ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांमध्ये गुणवत्ता आणि कल्पकतेची अजिबात कमतरता नाही. येणारा काळ हा संशोधनाचा असून विद्याथ्र्यांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता आपल्या संशोधनातून स्वतःचे ‘स्टार्टअप’ उभे करावे आणि ‘जॉब सीकर’ (नोकरी मागणारे) होण्यापेक्षा ‘जॉब गिव्हर’ (नोकरी देणारे) बनावे, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठाच्यावतीने आविष्कार स्पर्धत राज्यातून तिसरे स्थान मिळविल्याबद्दल सहभागी सर्व विद्याथ्र्यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते डॉ. पंजाबराव देशमुख अधिसभा सभागृह येथे सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे उपस्थित होते.
               कुलगुरूंनी सर्वप्रथम राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व विद्याथ्र्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन करताना कुलगुरू पुढे म्हणाले, अमरावती विद्यापीठातील विद्यार्थी, विशेषत: ग्रामीण भागातील मुले नाविन्यपूर्ण संशोधनात आघाडीवर आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बुलडाणा जिल्ह्रातील श्री अजिंक्य पोटे या विद्याथ्र्याने ‘अन्वेषण’ स्पर्धेत थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारून यश मिळविले. यावरून हे सिध्द होते की, आपल्या विद्याथ्र्यांचे ‘इनोव्हेशन’ जागतिक दर्जाचे आहे.
स्टार्टअप्ससाठी विद्यापीठाचा पुढाकार
                 बदलत्या काळाचा वेध घेताना कुलगुरूंनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) चे उदाहरण दिले. ते म्हणाले, “आज एआयमुळे सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रांती होत आहे. अशा वेळी विद्याथ्र्यांनी आपल्या कल्पकतेचे व्यापारीकरण करणे काळाची गरज आहे. आपल्या विद्यापीठातही ‘इन्क्युबेशन फाऊंडेशन’च्या माध्यमातून विद्याथ्र्यांना ‘सीड फंड’  दिला जातो. सध्या 45 स्टार्टअप्स आपल्याकडे नोंदणीकृत आहेत, याचा विद्याथ्र्यांनी लाभ घ्यावा.
यशाला पहिले पाऊल समजा
                  आविष्कार स्पर्धत आज मिळालेले यश हा शेवट नसून, हे तुमच्या कारकीर्दीचे ‘पहिले पाऊल’ आहे, असे समजून जिद्दीने पुढे वाटचाल करा, असा मोलाचा सल्ला कुलगुरूंनी विद्याथ्र्यांना दिला. यावेळी अजिंक्य पोटे, रोहिणी कांबे, प्रिया जंजाळकर, सौरभ श्रीराव, रोहण बुंदेले, राजीवकुमार जीवतानी, कु. श्रावणी ठाकरे, कु. रेणुका येंडे या विद्याथ्र्यांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार झाला. तसेच आविष्कार सेलचे अध्यक्ष डॉ. अजय लाड, आविष्कार सेल समन्वयक डॉ. मनिषा कोडापे, व्यवस्थापक डॉ. निरज घनवटे, डॉ. राजेश भोयर, डॉ. जयंत वडतकर तसेच शाहु महाविद्यालयाचे डॉ. शिरिष जैन व डॉ. प्रकाश केंद्रे, डॉ. तिडके यांचाही त्यांनी सत्कार केला. सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्तविक भाषणातून आविष्कार सेलच्या समन्वयक डॉ. मनिषा कोडापे यांनी आविष्कार स्पर्धेसाठी विद्याथ्र्यांकडून करून घेतलेली तयारी, स्पर्धेचे नियोजन आदीविषयी माहिती दिली. संचालन करत आभार कु. खुशबु जयस्वाल हिने मानले.  कार्यक्रमाला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच शिक्षक व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button