विद्यापीठात 4 फेब्राुवारी रोजी श्री संत मारोती महाराज व्याख्यानमालेचे आयोजन.. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाचा उपक्रम

अमरावती (दि. 02.02.2026) : श्री संत मारोती महाराजांच्या जीवन प्रवास, साहित्याची ओळख समाजाला करून देण्याकरिता विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने श्री संत मारोती महाराज संस्थान, माकनेर यांच्या दाननिधीतून केमिकल टेक्नॉलॉजी विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह येथे बुधवार 4 फेब्राुवारी रोजी दुपारी 4.00 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून अभ्यासक डॉ. प्रवीण वि. देशमुख, शिवशक्ती महाविद्यालय, कळंब, जि. यवतमाळ हे ‘आध्यात्मिक लोकशाहीचे श्रेष्ठ भाष्यकार’ या विषयावर व्याख्यान देणार आहे. व्याख्यान कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, रासायनिक तंत्रशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. बी. नाईक यांनी केले आहे.



