AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठातील उपयोजित परमाणू विद्युत विभागात एलईडी लॅम्प फॅब्रिाकेशन कार्यशाळा संपन्न

अमरावती (दि. 02.02.2026) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील उपयोजित परमाणू विद्युत विभागामध्ये उर्जा संवर्धन जागृती केंद्र अंतर्गत महाविद्यालयीन विद्याथ्र्यांसाठी एलईडी लॅम्प फॅब्रिाकेशन कार्यशाळा नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. सुजाता काळे, उद्घाटक म्हणून विद्यापीठ व्य. प. सदस्य तथा पदार्थ विज्ञान प्रमुख डॉ. संदीप वाघुळे, प्रमुख अतिथी म्हणून टेक्नोसंकल्प प्रा. लि. अमरावतीचे संचालक श्री संदीप पांडे उपस्थित होते.
               विद्याथ्र्यांनी उपलब्ध संधीचा लाभ घेऊन प्रयत्न करावेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्याथ्र्यांनी आपल्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असावे, प्रकल्प राबवावे, विविध सर्किट्स तयार करुन आपले तांत्रिक कौशल्य वाढवावे, असे आवाहन उद्घाटनीय भाषणातून डॉ. संदीप वाघुळे यांनी विद्याथ्र्यांना केले. प्रमुख अतिथी श्री संदीप पांडे यांनी कंपनी उभारण्यामागील परिस्थिती, व्यवसाय कशाप्रकारे उभारला याची माहिती देवून विद्याथ्र्यांना त्यांनी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर प्रा. डी.आर. सोळंके यांनी उर्जा संवर्धनाचे महत्व, एलईडी लॅम्पची कार्यक्षमता, निर्मिती प्रक्रिया यावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले.
               अध्यक्षीय भाषणात डॉ. सुजाता काळे यांनी कार्यशाळा केवळ एलईडी लॅम्प निर्मितीपुरती मर्यादीत नाही, तर त्यामागील आधुनिक तंत्रज्ञान, प्रायोगिक कौशल्य विकास, शा·ात विकासासोबतच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करा, असा मोलाचा सल्ला विद्याथ्र्यांना दिला.
                कार्यशाळेत 65 विद्याथ्र्यांनी भाग घेतला. विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी श्री चंद्रकांत चौधरी, एन.एस्सी. अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्याथ्र्यांनी प्रशिक्षण दिले. विद्यापीठ संलग्नित महात्मा फुले महाविद्यालय, वरूड, राजश्री शाहू महाविद्यालय, चांदुररेल्वे या महाविद्यालयातील विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले होते. कार्यशाळेला प्रा. के.डी. चिंचखेडे, प्रा. पी.एस. कंटाळे, प्रा. ए.एस. कदम, प्रा. यु.व्ही. चौधरी, डॉ. एन.एन. सरकार, प्रा. अमिन शाह, प्रा. सोनाली माचेवार, प्रा. यामीन शेख, प्रा. चेतना सावरकर, प्रा. हिमानी राऊत, प्रा. पल्लवी देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. पायल गवई, तर आभार राजकुमार राठोड याने मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्याथ्र्यांनी अथक परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button