सहकार व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती, दि. 31 (जिमाका) :
सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी अमरावती येथील भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेश प्रक्रिया दि. 1 जानेवारी ते 31 जून 2026 या कालावधीसाठी असून प्रत्यक्ष प्रवेश दि. 1 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान दिले जाणार आहेत.
सहकार विभागाने सहकारी संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम अनिवार्य केला आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दूरस्थ शिक्षण पद्धतीने पूर्ण करता यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघामार्फत राज्यातील 13 सहकार प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून हा पदविका अभ्यासक्रम पोस्टल पद्धतीने राबविण्यात येत आहे.
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी प्राचार्य, भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहकार प्रशिक्षण केंद्राचे भाऊसाहेब भोकरे यांनी केले आहे.



