
अमरावती (दि. 22.12.2025) – सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे 06 ते 10 जानेवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बेसबॉल (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये एम.जे.एफ. अॅन्ड विठ्ठलराव राऊत महाविद्यालय, भातकुलीची कु. अंकिता हिवरकर, कु. साक्षी बोरकर, कु. जान्हवी निशानराव व कु. सानिका कोलटके, श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय, अंजनगांव सुर्जीची कु. शिवाणी वरखडे, कु. समिक्षा वानखडे, कु. जान्हवी गौर व कु. खुशी शेरकर, अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळची कु. मृणाल फुसाटे, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची कु. मानसी घोडके, जनता कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरची कु. प्राची घाटे व कु. कांचन ईवरकर, प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, अमरावतीची कु. नंदिनी इंगळे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. वैष्णवी गिरी, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. तनुजा त्रिपाठी, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. राधिका सिकची व कु. साक्षी धारस्कर, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची कु. ज्ञाने·ारी वाघ, रामकृष्ण महाविद्यालय, दारापूरची कु. सनिका लव्हाळे व कु. राजनंदानी गवळी, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसदची कु. समिता बोराडे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरणनगर अमरावती येथे दि. 25 डिसेंबर, 2025 ते 03 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



