Latest NewsMaharashtra

पुलाखाली पाण्यात आढळला मनोरुग्णाचा मृतदेह; मुर्तीजापूर तालुक्यातील जामठी फाट्याजवळ धक्कादायक घटना

मुर्तीजापूर : मुर्तीजापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील जामठी फाट्याजवळ आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली. माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका पुलाखाली पाण्यात मनोरुग्णाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, शेख शकील शेख रशीद (वय 45, रा. आरखेड) हा व्यक्ती गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. आज सकाळी नागरिकांना पुलाखालच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. याची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला.

पोलीस तपास सुरू

मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून, त्याचा मानसिक विकारामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

स्थानिकांमध्ये चर्चा

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पुलाखाली मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही स्थानिकांनी संबंधित व्यक्तीला काही दिवसांपूर्वी परिसरात फिरताना पाहिल्याचे सांगितले आहे.



Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button