Latest NewsMaharashtra Politics
जन सुरक्षा कायद्याला शिवसेनेचा विरोध
महाराष्ट्रामध्ये जन सुरक्षा कायदा मंजूर झाल्यानंतर आता त्याचा विरोध सुरू झाला आहे. नांदगाव तालुक्यातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने या कायद्याविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नांदगाव तहसील कार्यालयात नायब तहसीलदार देवेंद्र कुरे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी हा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या मते, हा कायदा लोकशाही मूल्यांचे उल्लंघन करतो. यामुळे निष्पाप जनतेवर अन्याय होईल आणि त्यांच्या लोकशाही हक्कांची पायमल्ली होईल. जर हा कायदा रद्द झाला नाही, तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लोकशाहीच्या नावाखाली जनतेचा गळा घोटणाऱ्या या कायद्याला आता नांदगावातूनही जोरदार विरोध होत आहे.




