Latest NewsPune

“पुण्यात तक्रार! संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल मागणी”

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ठ दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत कॅन्टीनमध्ये मोठा गोंधळ घातला होता. संजय गायकवाड यांनी यावेळी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण देखील केली होती. संबंधित घटना ही दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही पडलेले बघायला मिळाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत या घटनेचा उल्लेख करत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर सभागृहात भूमिका मांडली होती. तसेच आमदारांना सामाजिक भान असणं आवश्यक असल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. या घटनेप्रकरणी आता मोठी बातमी समोर येत आहे.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवडचे युवक अध्यक्षांनी पोलिसात तक्रार केली आहे. चेतन पवार या अर्जदाराने संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार केली आहे. संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button