विमानाच्या कार्गो पार्सल सेवेतून गांजा तस्करी; नागपूर येथे १० किलो गांजा जप्त

नागपूर : गांजा तसेच अंमली पदार्थांची वाहतूक विक्री करण्यास बंदी असताना चोरून गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. यावेळी तर चक्क विमानाच्या कार्गो पार्सल सेवेच्या माध्यमातून तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्गोच्या पार्सलमधून नागपूर येथून तब्बल १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
गांजासारख्या अंमली पदार्थाची तस्करी सुरूच असल्याचे प्रकार नागपूरमध्ये झालेल्या कारवाईत समोर आला आहे. विमानसेवा पार्सलच्या माध्यमातून गांजा तस्करी करण्यात येत असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत गांजा तस्करी रेल्वे मार्गे किंवा रोडच्या मार्गे व्हायची. आता मात्र गांजा तस्करी ही विमानाचा मार्ग होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
खरड्याच्या बॉक्समध्ये पॅकिंग
ओडिसावरून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या पार्सलमध्ये गांजा नेला जात होता. नागपूरच्या कार्गो मधून जातांना हा प्रकार उघडकीस आला आहे. खरड्याच बॉक्समधून गांजा पॅक होऊन जात होता. यात काही संशयास्पद असल्याने विमानतळवर तपासणी झाली. यात हा प्रकार समोर आला. दरम्यान सोनेगाव पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पोहचून तपासणी केली. पार्सल उघडलं असता गांजा त्यात मिळून आला.
पार्सल पाठविणाऱ्याची होणार चौकशी
याप्रकरणी सोनेगाव पोलिसानी अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पार्सल पाठविणाऱ्याचा ओडिशासावरील व्यक्तींचा आणि उत्तर प्रदेशच्या पत्त्यावर राहत असलेल्या व्यक्तीचा तपासाला सुरवात केली आहे. मात्र ओरिसा वरून निघालेले पार्सल नागपूरपर्यंत पोहचल असताना यात कुठलीच तपासणी झाली नाही का? नागपुरात संशयाचा आधारावर तपासणी केली म्हणून हा प्रकार उघडकीस आला. यापूर्वी असा प्रकार झाला तर नाही ना अशीही शंका आता व्यक्त केली जात आहे.



