AmravatiamravatinewsLatest News

बारावीचा निकाल जाहीर: अमरावतीचा निकाल 91.43 टक्के, मुलींनी मारली बाजी

अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. तसेच, दुपारी 1 वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना सिटी न्यूजच्या वेबसाईट https://city24.news वर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, उद्यापासून (6 मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.

बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यंदाचा राज्याचा निकाल 91.88 टक्के लागला. यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 96.74 टक्के लागला आहे. तर, सर्वात कमी लातूर विभागाचा लागला आहे. लातूर विभागाचा निकाल 89.46 टक्के लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.51 टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 5.07 टक्क्यांनी अधिक आहे.

यंदा निकालाचा टक्का घसरला
यंदा निकालाचा टक्का घसरला असून फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के लागला होता. तर, फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला. त्यामुळे यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकालाचा टक्का 1.49 नं घसरला आहे

विभागनिहाय निकाल
कोकण : 96.74 टक्के
पुणे : 91.32 टक्के
कोल्हापूर : 93.64 टक्के
अमरावती : 91.43 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 92.24 टक्के
नाशिक : 91.31 टक्के
लातूर : 89.46 टक्के
नागपूर : 90.52 टक्के
मुंबई : 92.93 टक्के

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button