‘चेन्नई-भगत की कोठी एक्सप्रेस’चे अकोला स्थानकावर जल्लोषात स्वागत!

अकोला : रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘डॉ. एम.जी.आर चेन्नई सेंट्रल ते भगत की कोठी (राजस्थान)’ या नव्या एक्सप्रेस ट्रेनचे अकोला रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ही एक्सप्रेस महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये धावणार असून प्रवाशांसाठी एक नवा पर्याय खुला झाला आहे.
या ट्रेनमध्ये एकूण २२ कोच असणार आहेत. त्यामध्ये –
४ थर्ड एसी कोच
४ थर्ड एसी इकॉनॉमी कोच
२ सेकंड एसी कोच
६ सेकंड स्लीपर कोच
४ जनरल कोच
अशा प्रकारे विविध श्रेणीतील डब्यांचा समावेश आहे.
या नव्या एक्सप्रेसमध्ये आधुनिक डबे आणि अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक, स्टॉप्स आणि आरक्षणाची माहिती लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहे.
या नव्या ट्रेनमुळे अकोलावासीयांसह महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांना राजस्थान आणि दक्षिण भारत जोडणाऱ्या या मार्गाचा मोठा लाभ होणार आहे.



