AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं!

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. नयना गुंडे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रिया, शिक्षक मतदारांची नोंदणी आणि संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाबाबत महत्त्वाची माहिती दिली.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या शिक्षक मतदारांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, पात्र शिक्षकांना २६ सप्टेंबर २०२६पर्यंत मतदार म्हणून नोंदणी करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमानुसार टप्प्याटप्प्याने पार पडणार आहे.

नेमका काय आहे निवडणुकीचा कार्यक्रम?

२९ सप्टेंबर — निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध
६ ऑक्टोबर — नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
७ ऑक्टोबर — उमेदवारी अर्जांची छाननी
९ ऑक्टोबर — उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
२३ ऑक्टोबर — मतदान
२७ ऑक्टोबर — मतमोजणी
३१ ऑक्टोबर — संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण

या निवडणुकीसाठी शिक्षक मतदारांना २६ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शिक्षक मतदारांनी अंतिम मुदतीपूर्वी आपली मतदार नोंदणी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीकडे शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे. आता निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा, नामनिर्देशन आणि त्यानंतरची निवडणूक प्रक्रिया यांना वेग येणार आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर सिटी न्यूजचं बारकाईने लक्ष राहणार आहे.

अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button