Accident NewsAkolaLatest News

अकोलयातील शिव मंदिराजवळ भीषण अपघात

अकोला – अकोल्यातील मोठ्या उमरी परिसरात, शिव मंदिराजवळ रविवारी रात्री एका भीषण अपघाताने खळबळ उडवली. श्री संत गुलाब बाबा बँड पार्टीची 407 गाडी आणि एक दुचाकी यांच्यात जोरदार धडक होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, 407 गाडी (MH 30 L 2093) बँड पार्टीसह टॉवर चौकाच्या दिशेने निघाली असताना समोरून आलेली दुचाकी (MH 28 AH 5826) जोरात धडकली. या अपघातात दुचाकीवरील प्रवीण वानखडे आणि आनंद जंजाळ हे दोघे युवक गंभीर जखमी झाले.

अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना ओझोन हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या प्रकरणाचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button