Latest NewsYavatmal
पुसद आणि महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस; काही गावांमध्ये गारपीट

यवतमाळ : आज सायंकाळच्या सुमारास पुसद व महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारपीटही झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, मात्र सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली.
पुसद तालुक्यातील आमटी, गौळ, हर्षी तसेच महागाव तालुक्यातील खडका गावात गारपीट झाल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे.
पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अंधारातच दिवसाचा शेवट करावा लागत आहे.
यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, कारण काही भागांमध्ये उभ्या पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये अजूनही पावसाची शक्यता वर्तवली आहे.



