Crime NewsLatest NewsNagpur

बाळ दूध पीत नव्हतं… आईने तणावातून घेतला टोकाचा निर्णय! सर्वश्रीनगर हादरलं

“आई” हा शब्द उच्चारताच प्रेम, माया, आणि त्याग डोळ्यांसमोर येतो. पण जर तीच आई आपल्या बाळासाठी हतबल होऊन टोकाचं पाऊल उचलते, तर त्याहून दुःखद काहीच असू शकत नाही. हुडकेश्वरच्या सर्वश्रीनगरमध्ये घडलेली ही घटना ऐकून तुमचेही हृदय पिळवटून निघेल.

हुडकेश्वरच्या सर्वश्रीनगर परिसरात एका मातेने बाळाच्या भवितव्याची चिंता करत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. काही दिवसांपूर्वीच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता, मात्र बाळ वारंवार दूध नाकारत असल्याने ती प्रचंड तणावात होती. कुटुंबाने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नैराश्याने ग्रासलेल्या या आईने अखेर आपल्या जीवनाचीच समाप्ती केली.या दुःखद घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, मात्र एक आई आपल्या नवजात बाळाला सोडून निघून जावी, हे पाहून संपूर्ण परिसर शोकसागरात बुडालाय.

एक आई आपल्या बाळासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावते, पण जेव्हा तिला योग्य मानसिक आधार मिळत नाही, तेव्हा असे हृदयविदारक प्रसंग घडतात. जर तुमच्या आजूबाजूला कुणीही मानसिक तणावात असेल, तर त्यांना मदतीचा हात द्या, त्यांच्याशी बोला… कदाचित तुमच्या काही शब्दांमुळे एक जीव वाचू शकेल!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button