citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात सराईत दुचाकी चोराला अटक; ८५ हजारांच्या दोन गाड्या जप्त

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील वाहनचोरीचे दोन गुन्हे उघड

नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका सराईत दुचाकी चोराला अटक केली आहे. महेंद्र खेमराज सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ८५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

घरासमोरून स्प्लेंडरची चोरी

काळमेघ नगर परिसरातील रहिवासी गौरव गिरीश दुरुगकर यांची हिरो स्प्लेंडर दुचाकी १८ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मध्यप्रदेश पासिंगची गाडी विकण्याच्या प्रयत्नात आरोपी जाळ्यात

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी मध्यप्रदेश पासिंगची दुचाकी विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वैशाली नगर परिसरातून महेंद्र सोनवणे याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने गौरव दुरुगकर यांची स्प्लेंडर दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात साकोली, जिल्हा भंडारा येथून होंडा शाईन दुचाकीही चोरी केल्याचे समोर आले.

दोन वाहनचोरीचे गुन्हे उघड

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एकूण ८५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण फलके करीत आहेत.

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

सिटी न्यूज | नागपूर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button