राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत हरीयाणा प्रथम, महाराष्ट्र द्वितीय
अमरावती, दि. 12 :- 68वी राष्ट्रीय शालेय कबड्डी 14 वर्षे मुले आणि मुली क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली. यात मुले आणि मुलींच्या स्पर्धेत हरीयाणा संघाने प्रथम, तर महाराष्ट्राच्या संघाने दुसरा क्रमांक पटकाविला.
स्पर्धेच्या समारोपाला अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, विद्यापीठाचे कुलसचिव अविनाश असनारे, अतिरिक्त मनपा आयुक्त शिल्पा नाईक, उपजिल्हाधिकारी डॉ. जाधव, क्रीडा उपसंचालक विजय संतान, विदर्भ कबड्डी असोसिएशन जीतू ठाकुर, उपस्थित होते.
मुले व मुली यांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र विरुद्ध हरीयाणा यांचा सामना रंगला. मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हरीयाणा, द्वितीय महाराष्ट्र, तर कर्नाटक संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हरीयाणा, द्वितीय महाराष्ट्र, तृतीय क्रमांक दिल्ली संघाने पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात आला.



