Crime NewsLatest NewsNagpur gramin

कळमना पोलिसांची नॉयलॉन मांजावर दोन ठिकाणी छापामारी

सर्वत्र नॉयलॉन मांजा वापरण्यास शासनाने बंदी केली असतांना सुद्धा अनेक ठिकाणी मांजा विक्री होत असल्यामुळे नागपूर शहरातील कळमना पोलिसांनी दोन ठिकाणी छापामारी करून लाखोचा नॉयलॉन मांजा जप्त केला. या धडक कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले.

मकर संक्रात उत्सवात नागपूर शहरात पतंग उडविन्याची मोठी परंपरा असते. मात्र हल्ली नॉयलॉन या जीवघेणा मांजा ला बंदी असताना सुद्धा अनेक ठिकाणी मांजा विक्री केली जात आहे अशात नागपूर पोलिसांनी नॉयलॉन मांजावर धाडस्त्राला सुरुवात केली. मिळालेल्या गुप्त माहिती वरून कळमना पोलिसांनी 9डिसेम्बर ला मिनिमाता नगर एन आय टी गार्डन जवळ छापा टाकून नॉयलॉन मांजा सह दोघांना ताब्यात घेतले. यात जानकी नगर कळमना राहणारा 34वर्षीय अनिल अरुण चौकसे तर ओम नगर कळमना राहणारा 19वर्षीय अनिस लतीफ शेख या दोघांना ताब्यात घेऊन धडक कारवाई करण्यात आली.

दोघांना विचारणा केली असता त्यांनी अन्य एका इसमाँचे नाव सांगितले असता पोलिसांनी दुसरीकडे आपला मोर्चा वळवीला. पोलीस पथका ने पुन्हा 10 डिसेंबर ला गणेशपेठ पोलीस स्टेशनं हद्दीत असलेल्या जुना जेलखाना परिसरात राहणारा 32वर्षीय सद्दाम इस्माईल शेख याला सुद्धा ताब्यात घेऊन तिघा विरुद्ध कलम 5,15 पर्यावरण संरक्षण कायदा सहकलम 125,233 अंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपी कडून तब्बल 5 लाख 56 हजार रुपये किंमतीचा नॉयलॉन मांजा जप्त केला. ही कारवाई परीमंडळ क्रमांक 5चे पोलीस उपायुक्त श्री निकेतन कदम सहायक पोलीस आयुक्त विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातं कळमना पोलीस स्टेशनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश आडे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे पोलीस कर्मचारी बाळा साकोरे विशाल भैसारे वसिम देसाई ललित शेंडे यांनी केली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button