Uncategorized

तितंबा विषबाधा प्रकरणात एफआयआर! अधीक्षक निलंबित, आदिवासी विभागाची मोठी कारवाई

धारणी तालुक्यातील तितंबा आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणाची आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
आदिवासी अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात संबंधित दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्व आश्रमशाळांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आश्रमशाळांमधील स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत आदिवासी प्रकल्प विभागाकडून अधिक काटेकोरपणे देखरेख ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात तितंबा आश्रमशाळेचे अधीक्षक गोळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सध्या ते निलंबनाच्या निषेधार्थ उपोषण करत असून आत्मदहनाचा इशाराही दिला आहे.

याबाबत त्यांना आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून पत्र देण्यात आले असून, सुरू असलेली चौकशी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही अप्पर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button