AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत २ जूनला ‘डाक अदालत’; ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे होणार निवारण

भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवार, दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.

या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत.

विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल या डाक अदालतमध्ये घेतली जाणार आहे.

तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद तसेच तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे.

हे अर्ज ‘प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती – ४४४६०२’ यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज १ जूनपूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य असल्याची माहिती प्रवर अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींचे वेळेत निवारण व्हावे यासाठी या डाक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाकडून करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button