AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत पोलिसांचे मेगा कोंबिंग ऑपरेशन; नाकाबंदी, शस्त्र जप्ती आणि गुन्हेगारांवर धडक कारवाई

अमरावती शहरातून गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणारी एक मोठी बातमी समोर येत आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या थेट आदेशान्वये संपूर्ण शहरात एकाच वेळी भव्य नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले असून या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी काल रात्री मोठ्या प्रमाणावर मेगा ऑपरेशन राबवले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, २४ पोलीस अधिकारी आणि तब्बल १३१ पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते.

संपूर्ण शहरात नाकाबंदी करत प्रत्येक संशयित वाहन आणि व्यक्तीची कसून तपासणी करण्यात आली. प्रमुख चौक, संवेदनशील भाग आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परिसरांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली होती.

या धडक मोहिमेदरम्यान शहरातील सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. घरफोडी आणि मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.

दरम्यान, आर्म्स ॲक्ट अंतर्गत तीन मोठ्या कारवाया करत पोलिसांनी संशयितांकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत. याशिवाय गांजा सेवन करून फिरणाऱ्या तिघांविरोधातही पोलिसांनी तत्काळ कायदेशीर कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठा बडगा उगारला. दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल १३ गुन्हे दाखल करत मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली आहे.

तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या २७ जणांवर आणि त्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व ढाबा चालकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर वेगवेगळी पथके तयार करून छापे टाकले. या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोवंश जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा कडक संदेश स्पष्टपणे पोहोचला आहे.

अमरावती पोलिसांच्या या मेगा ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button